● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वादळावर प्रेम केले 🌷
ना कळे आता मनागत वागताना
कोरडे का वाटते आभाळताना
वादळावर प्रेम केले एवढे की
वाटले ना भय किनारा सोडताना
सावली मी सोडली तेव्हा अचानक
ऊन आले सोबतीला चालताना
'प्रेम नाही' हे तुला सांगीतले मी
पण तरी का लाजले नाकारताना
ही नशा कसली मला सांगाल कोणी?
झिंगते मन वेदना गोंजारताना
भिस्त का कुलुपावरी असते 'तुझी'ही
देवळाची सर्व दारे लावताना
नाव निघते बघ तुझे अन् त्रास होतो
आसवांना परतवूनी धाडताना
फक्त योगायोग हे आयुष्य आहे
चीड का येते तरी स्वीकारताना?
प्राजक्ता पटवर्धन
गझलकारा प्राजक्ताजी पटवर्धन यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments