• गझल प्रभात • (भाग ६४ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
गझलकार प्रशांत वैद्य |
🌹रात्रीचे चोचले किती 🌹
जुने किती अन् नवे किती
या शहराला तडे किती....!
सांग उजेडा तुझ्यामधे
सूर्य किती काजवे किती...!
डोळ्यांचे मालक आपण
डोळस अन् आंधळे किती...!
एक इयत्ता जन्माची
त्यात "उजळण्या" धडे किती...!
सावरणारे किती इथे
गर्दीमध्ये बघे किती...!
तुझे रोपटे सळसळले
धरले बघ बाळसे किती...!
ओलाव्याचे कारण शोध
सरी किती अन् सडे किती....!
तुला दिलेल्या शब्दाला
सांग मला जागले किती....!
दुनियेमधल्या त्यागांनो
तुम्हा मिळाले दगे किती...!
दिवसाची होते परवड
रात्रीचे चोचले किती....!
पाठ जरी तू दुनियेला
तुला कुणी जाणले किती...!
प्रशांत वैद्य
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments