Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

About us

 🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰

-----------------------------

गझल मंथन साहित्य संस्थेचे विविध उपक्रम....

-----------------------------

गझल मंथन साहित्य संस्थेला मिळालेले सन्मान -

१)करम संस्थेकडून गझल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यसाठी पुरस्कार

२)परिमल साहित्य संस्था चाळीसगावचा उपक्रमशील संस्था पुरस्कार. 

३)महाराष्ट्र बाजारपेठ मुंबईचा 'गुण गौरव पुरस्कार - २०२२

-----------------------------

🌹 उपक्रम---🌹

१) गझल मंथनच्या १ व २ या व्हाटस् अप समुहात एक मतला दोन शेर आणि मासिक गझल स्पर्धा घेऊन तज्ञ गझलकार मान्यवरांकडून तपासून क्रमांक काढले जातात, त्यावर परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते आणि वर्षाच्या शेवटी एक विजेता आणि ५ उपविजेते निवडून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिकं दिले जातात.

२) गझल गायन स्पर्धा -गझल गायनाच्या विविध फेऱ्या घेऊन शेवटी तज्ञ गझल गायकांमार्फत महाविजेता ठरवला जातो. स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक दिले जाते.

३) फेसबुक पेजवर सदस्यांच्या निवडक गझलांचे पोस्टर प्रदर्शित केले जाते व हजारो वाचकांपर्यंत आपली गझल पोहचवली जाते.

४)गझल मंथनच्या फेसबुक पेजवर मान्यवर गझलकारांच्या लाईव्ह मुलाखती घेतल्या जातात तसेच गझलविधेवर वेगवेगळ्या कंगोऱ्यातून लाईव्ह मार्गदर्शन, मनोगत, संवाद आदी उपक्रम घेतले जातात.

५) गझल मंथनच्या युट्यूब वाहिनीवर ऑनलाईन  गझल मुशायऱ्यांचे व मुलाखतींचे आयोजन केले जाते. तसेच इतर गझलकारांच्या दर्जेदार गझला गाऊन त्यांचा देखील मानसन्मान वाढवला जातो. संगीतबद्ध केलेल्या गझलांना देखील युट्यूबवर प्रसारीत केले जाते

६) गझल मंथन साहित्य संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू झाले असून त्यात महाराष्ट्रातील सर्वच गझलकारांचा परिचय, पत्ते, ईमेल आयडी व संपर्कासाठी मोबाईल नंबर इत्यादी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

७) गझल मंथन साहित्य संस्था द्वारा राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष मंचावर गझल मुशायऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रस्थापित तसेच नवोदितांना देखील संधी दिली जात आहे. या वर्षी आत्ता पर्यंत विक्रमी असे १७ बहारदार गझल मुशायरे घेण्यात आले आहेत व महाराष्ट्रातील अनेक नामवंत गझलकारांची त्यात उपस्थिती लाभली आहे.

८) गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा निःशुल्क ऑनलाईन व ऑफलाईन कार्यशाळा घेण्यात येतात. गझलेतील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. नंतर एक स्पेशल व्हाटस अप ग्रुप करून तिथे प्रत्यक्ष व निर्दोष गझल लिहायला शिकवले जाते. येथेही तज्ञ गझलकार मार्गदर्शन करत असतात. आत्तापर्यंत २१ निःशुल्क कार्यशाळांतून ५५० च्या वर कवी गझल तंत्र शिकले आहेत.

९) गझल मंथन साहित्य संस्थेच्या प्रकाशन विभागातर्फे आजीवन सभासदांच्या प्रातिनिधिक गझलसंग्रहांची एक मालिका सुरू झाली असून 'गझलयात्री -१' चे नुकतेच पुण्यात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे व लगेचच 'गझलयात्री - २ ची तयारी सुरू झाली आहे. ही मालिका अशीच पुढेही सुरू राहणार आहे.

१०) गझल मंथन साहित्य संस्था द्वारा खास आजीवन सभासदांना गझलेवर विशेष मार्गदर्शन मिळत आहे तसेच आजीव सभासदांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर' स्वप्नपूर्ती योजने अंतर्गत' गझल मंथन प्रकाशन संस्थेतर्फे अतिशय माफक दरात स्वतःचा गझलसंग्रह काढून मिळणार आहे. गझल मंथनच्या कुठल्याही मुशायऱ्यात त्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करून मिळेल. अनेक खर्चांची यानिमित्ताने बचत होणार आहे. आतापर्यंत संस्थेने असे दोन गझलसंग्रह प्रकाशित करून दिले आहेत.

११) गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत दरवर्षी दर्जेदार,संग्राह्य असा 'गझलामृत दिवाळी अंक काढला जातो. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे याची १००% प्रकाशनपूर्व नोंदणी होते. या अंकास चिरांगन उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार २०२१, हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

१२) आज..गझल मंथन साहित्य संस्था ही इतर साहित्यसंस्थांच्या सोबत मोठमोठी साहित्य संमेलने, कार्यशाळा आदी साहित्यिक उपक्रमात सहयोगी आयोजक साहित्य संस्था म्हणून काम करत आहे व यापुढेही.. भविष्यात कायम करत राहणार आहे.

१३) आगामी काळात गझलेच्या प्रचार प्रसारासाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे स्वतःचे अँप लॉंच होत असून याद्वारे गझल मंथनच्या विविध उपक्रमांची माहिती साहित्यिकांना, गझलकारांना घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

१४) गझल मंथन साहित्य संस्थे द्वारा लवकरच 'गझल मंथन' मासिक सुरू होणार असून यात महाराष्ट्रातील  प्रस्थापित गझलकारांसोबतच नवोदितांच्याही दर्जेदार गझला, गझले संबधी मार्गदर्शक लेख, मुलाखती, परिचय, समीक्षण,प्रकाशन व कार्यवृत्तांत अशा विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती रसिक साहित्यिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.

१५) यापुढे गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा दर महिन्याला किमान एक गझल मुशायरा आयोजित केला जाणार आहे आणि त्यात प्रस्थापितांसोबत नवोदितांनाही गझल पेश करण्याची संधी दिली जाणार आहे.

१६) गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने दरवर्षी गझल सम्राट सुरेश भट साहेब यांच्या जयंतीनिमित्त १५ एप्रिल रोजी त्यांच्या उत्तमोत्तम गझलांचा अभिवाचन सोहळा घेण्यात येतो. या वर्षी लातूर येथे सुधाकर कुलकर्णी प्रतिष्ठान व गझल मंथन साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ऊत्साहात पार पडला.

१७) यापुढे गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा दर वर्षी किमान एक अखिल भारतीय मराठी गझल संमेलन घेऊन प्रस्थापित तसेच नवोदित गझलकारांना आमंत्रित करून गझल सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. या वर्षी (२०२२ - २०२३)  १३ व १४ मे रोजी गंगाखेड परभणी येथे पहिलेवहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यात जवळपास १७५ गझलकार मान्यवर सहभागी झाले होते. 

सोबत प्रसिद्ध गझल गायक संकेत नागपूरकर यांचा गझल गायनाचा कार्यक्रम या संमेलनाचे आकर्षण ठरला.

१८) गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा गझल मुशायऱ्यांबरोबरच गझल सादरीकरण कार्यशाळा देखील आयोजित केली जात आहे. ज्यात सहभागी गझलकारांना गझलेचे सादरीकरण कसे करावे ह्याचे उत्तम मार्गदर्शन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांकडून केले जाणार आहे. ह्या सर्व कार्यशाळा निशुल्क राहणार आहेत. 

-------------------------

गझल मंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र राज्य (रजिस्टर्ड )

🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰

Post a Comment

0 Comments