• गझल प्रभात • (भाग ६५ )
🌼 दिवाळी विशेष 🌼
![]() |
| गझलकार दत्तप्रसाद जोग |
🌹अश्रू एखादा ओघळणार म्हणा🌹
तुला पाहताना अश्रू एखादा ओघळणार म्हणा
ओठ जरी शिवले माझे तो सगळे बडबडणार म्हणा!
जशा भावना निघून गेल्या एक रितेपण आले ना!
मनात बिलकुल काही नाही असे कसे म्हणणार म्हणा?
हे सगळे आकडे हातचे होतीलच अदृश्य पुढे
जाऊ द्या! हाती आधीचे शुन्य तरी उरणार म्हणा!
'कंटाळा आला सगळ्याचा' हे कारण खोटे आहे!
(खरे झाकण्यासाठी काहीकाळ तरी पुरणार म्हणा!!)
दूर व्हायच्या आधी कारण मी सांगू शकलो नाही
आणि आज ते सांगितल्याने तुला कुठे पटणार म्हणा??!
कबूल की नियतीचा आसुड तुझ्या नि माझ्यावर पडला
पण नात्याच्या पाठीवरही त्याचा वळ असणार म्हणा!
आता हट्टाने एखादे पाप करुन घेईल सहज
खात्री आहे हेच मन मला नंतर कुरतडणार म्हणा!
तुझ्या पुढे कोणीही नाही तूर्त असे मानूया चल!
फार पुढे जो गेला आहे तुला कुठे दिसणार म्हणा!
'प्रसाद'
दत्तप्रसाद जोग
गोवा
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments