● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷आंधळ्या देवतेने कुठे जाणले 🌷
मार्ग सारे जरी मी नवे शोधले
संकटांनी तरीही पुन्हा घेरले
घ्यायची उंच होती भरारी मला
पाय मागे कळेना कुणी खेचले
झाड होते जरी आडरानामधे
सोबती त्यास पक्षी तिथे लाभले
काम हातातले पूर्ण होता क्षणी
श्रेय घेण्यास सारे पुढे धावले
न्याय फिरला जरी फक्त पैशामुळे
आंधळ्या देवतेने कुठे जाणले
माधुरी बर्वे
गझलकारा माधुरीजी बर्वे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments