● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷त्याने चोरली असेल भाकर 🌷
अशी कशी ही नियती आहे इतकी कट्टर
दुःख यातना सोसत सोसत चालू कुठवर
घरट्यामधल्या सुखास माझ्या तोटा नव्हता
किती बिथरले दुःखाने घर त्याच्यानंतर
बाप राबतो.. झटतो.. झिजतो.. रात्र जागतो
त्यामुळेच तर उगवत असते पहाट सुंदर
किती मारले तरी नव्याने पुन्हा जन्मते
इच्छा इतकी हट्टी असते कळले नंतर
जीव भुकेने व्याकुळलेला किती बिचारा
तरीच त्याने जरा चोरली असेल भाकर
सौ. आसावरी जाधव
गझलकारा सौ. आसावरीजी जाधव यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments