● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷जग रुसले असावे 🌷
वाईट कोणाचे कधी केले नसावे
बहुतेक यावरतीच जग रुसले असावे
जर सूड असला घ्यायचा साऱ्या जगाचा
जेव्हा रडू येते अश्यावेळी हसावे
मुक्कामस्थाने वेगळी असुदेत ना पण
नुसत्या प्रवासाला तरी सोबत बसावे
कोणीतरी होणार असले जर सुखी तर
नुकसान म्हणजे फायदा समजत फसावे
केव्हातरी उत्साह येतो जीवनाला
तेव्हाच व्हावे 'बेफिकिर' अन आळसावे
भूषण कटककर 'बेफिकीर'
गझलकार भूषणजी कटककर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments