Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

हवे ते सदा देत गेलो Gazalkar Ramkrishna Roge

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷हवे ते सदा देत गेलो🌷


तुला जे हवे ते सदा देत गेलो 

कळाले जहर मी कसे घेत गेलो 


कधी मायबापा सवे राहिलो मी 

जिथे तू म्हणाली तिथे येत गेलो 


अरे जीवना मी कधी हट्ट केला 

जसे जे मिळाले तसे घेत गेलो 


सुगंधात न्हालो सदा वेदनेच्या ...

कुण्या मोग-याच्या न बागेत गेलो 


पुढे जिंदगी ज्ञानगंगाच झाली 

तुका ज्ञानियाच्याच कक्षेत गेलो 


नियम मोडला अन सफल तेच झाले 

किती मुर्ख ना! मीच रांगेत गेलो


रामकृष्ण रोगे


 गझलकार रामकृष्णजी रोगे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments