Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कुठे जोड द्यावा तुला जीवना Gazalkara Sonal Gadewar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷कुठे जोड द्यावा तुला जीवना  🌷


स्वतःचीच करतोस जर वल्गना 

सहन काय करशील अवहेलना


सुखे रोज येतात जातात पण 

उभ्या सोबतीला सतत  वेदना


प्रलोभन मनाला बळी पाडते 

द्विधामुक्त करते खरी प्रार्थना  


सुगी ताटभर धान्य देईल का? 

बळी रोज करतोय आराधना 


स्वतःवर तिचे प्रेम जडते किती 

उमेदीत येताच.. संवेदना


तुला येत नाही हसवणे जरी 

मनातील जाणून घे यातना 


तुटत चाललेल्या कड्या पाहते

कुठे जोड द्यावा तुला जीवना 


सौ. सोनल मनोज गादेवार

यवतमाळ


 गझलकारा सोनलजी गादेवार यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments