Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

साकी तुझ्यामुळे Gazalkar Balu Shriram

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷साकी तुझ्यामुळे 🌷


आहे मिठीत आता मी थांबलो जरासा 

साकी तुझ्यात आता मी गुंतलो जरासा 


ती जी घरात माझ्या आहे सवत तुझी ती 

पण मी तुझ्याच सोबत बघ झोपलो जरासा 


नाही नकोच काही दुसरा विचार आता 

पोटात आज माझ्या मी पेटलो जरासा 


हे बघ तुझ्याच साठी सारे शरीर माझे 

घेताच घोट काही मी डोललो जरासा 


श्रीराम आज आता शुद्धीत ये जरासा 

सांगू नको मला की मी बहकलो जरासा 


बाळू श्रीराम 

9011970073

8459361515



 गझलकार बाळूजी श्रीराम यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments