Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी का कुठेही पोचले नाही Gazalkara Nisha Chausalkar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷मी का कुठेही पोचले नाही🌷


चालते आहे कधीची थांबले नाही 

आजवर मी का कुठेही पोचले नाही


फक्त सोन्याचा मिळाला वर्ख कळसाला

पायरीचे भाग्य‌ त्याला लाभले नाही


एक खिडकी द्यायची आवाज नेमाने

मी भयाने उंबऱ्याच्या  बोलले नाही


गोल चौकोनी नको आकार कुठलेही 

जन्मभर साच्यात जगणे चांगले नाही


मी तहाची बोलणी केली ऋतूंसोबत

मागणे माझे ऋतुंनी टाळले नाही


गाठते आहे शिखर मी खूप वेगाने 

बालपण माझ्यातले पण सोडले नाही.


पानगळ माझ्यात झाली पावसामध्ये

पाखरांचे एकही घर वाचले नाही


निशा चौसाळकर 

अंबाजोगाई



 गझलकारा निशाजी चौसाळकर  यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments