● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷प्रेमाचा दिवा लावायचा आहे 🌷
उजेडानेच द्वेषाचा तिमिर जाळायचा आहे
मला दुनियेत प्रेमाचा दिवा लावायचा आहे
पिढ्यांनी कोरल्या नोंदी जरी अश्रूत भिजलेल्या
मला इतिहास दु:खाचा सुखाने गायचा आहे
हवेचा हुंदका आला रडत ज्या झोपडीवरुनी
तिच्या दाराहुनी रस्ता सुखाचा न्यायचा आहे
सुगंधावर कुणाचीही कधीही मालकी नसते
खुलासा हाच बागेला मलाही द्यायचा आहे
कसा विश्वास ठेवू मी अमुर्ताच्याच मुर्तीवर
मला दगडातला ईश्वर अजुन पावायचा आहे
समुद्रा काळजी घे तू नदीचा देह पाण्याचा
तिचा हा देह पाण्यातच तिला मिसळायचा आहे
किती चुकलास तू वेड्या तिला समजून घेतांना
तुझ्या नात्यातला गुंता मला उकलायचा आहे
कधीची मी सही केली जगाच्या शेवटावरती
कवी माझ्यातला तोवर मला टिकवायचा आहे
नितीन देशमुख
गझलकार नितीनदादा देशमुख यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments