● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷आता सुधर म्हणाली🌷
याच्यापुढे तरी तू आता सुधर म्हणाली
ब्रेकप करुन मजला आता विसर म्हणाली
दुसरीकडे अता मी सेटिंग लावलेली
कृपया करु नको तू नजरानजर म्हणाली
समजू नकोस माझा होकार तू उगाचच
असशिल हवेत तर तू खाली उतर म्हणाली
वैताग येत आहे बेताल वागण्याचा
शिकलास तू कुठे ही सनकी हुनर म्हणाली
माझे मलाच माहित नसते कुठेकुठे मी
मिळते कुठून तुजला माझी खबर म्हणाली
संसार चाललेला आहे झकास माझा
लावू नकोस त्याला आता नजर म्हणाली
कालिदास चवडेकर
गझलकार कालिदासजी चवडेकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments