● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷श्रावण सरला होता🌷
लोक म्हणाले सुवास कुठला होता
तिच्या मिठीचा दरवळ सुटला होता
केसांमध्ये गजरा माळत होती
मात्र चेहरा कायम सुकला होता
तिने भुकेची सोय लावली अपुल्या;
पण देहाचा तुकडा विकला होता
अवतीभवती कुणीच राहत नव्हते
तिच्या एकटीचा हा खटला होता
पानगळीचा मौसम चालू नव्हता
वऱ्हांड्यात पाचोळा पडला होता
आईशिवाय जगणे कठीण ज्याचे
दाईच्या प्रेमावर जगला होता
दोघांना भिजण्याची इच्छा झाली
आणि नेमका श्रावण सरला होता
चेतन पवार
सिंदखेड राजा
गझलकार चेतनजी पवार यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments