Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

भाकरी पाहिजे Gazalkara Devka Deshmukh

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷भाकरी पाहिजे🌷


पोट आहे मला भाकरी पाहिजे 

मात्र त्याच्यासवे चाकरी पाहिजे 


चार भिंती मध्ये राज्य माझे जरी 

ना परी पाहिजे ती बरी पाहिजे 


माय दारात माझ्या बसावी अशी 

वृद्ध झाली जरी ती तरी पाहिजे 


ऐन वेळी मला याद आली तुझी 

नेमकी तू दिसाया घरी पाहिजे 


फार काही नको फक्त दे एवढे 

आसवांच्या रडाया सरी पाहिजे 


देवका देशमुख 

अकोला



 गझलकारा देवकामाई देशमुख यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


Post a Comment

0 Comments