Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

योजना राबव तुझ्या Gazalkara Vidya Deshmukh

  ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷योजना राबव तुझ्या 🌷


आधी स्वतःच्या तेवढ्या लग्नास तर वाचव तुझ्या 

नंतर वधू वर मंडळाच्या योजना राबव  तुझ्या


त्यांच्यामधे नक्की तुझी दिसणार उंची वाटते?

संख्या खुज्यांची भोवताली आणखी वाढव तुझ्या


पाहून सुतकी चेहरा येईल का कोणी जवळ

आत्म्यातले वैभव जरा शरिराकडे पाठव तुझ्या


नाचायला अंगण पुरेसे झाले जिला नाही कधी 

गोष्टी घराच्या तू तिच्यावर नेहमी बिंबव तुझ्या


माणुस नको आहे तुला..गाढव कुठे  मिळतेय बघ

वाहीलही ओझे तुझे..सोबत कधी वागव तुझ्या


होईलही आनंद  तेव्हा यायला मागे तुझ्या 

थोडे स्वतःच्याही पुढे जाऊन तर दाखव तुझ्या


येणार नाहित अप्सरा सुद्धा जवळ  स्वर्गातल्या

त्यांना जरा विद्येस तू हदयातल्या भेटव तुझ्या


प्रा. विद्या सुरेश देशमुख


 गझलकारा प्रा. विद्याजी देशमुख यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments