Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पिंपळ सळसळतो हल्ली Gazalkar Sachin Taro

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷पिंपळ सळसळतो हल्ली🌷


दोन घोट घेतो अन् तरंगतो हल्ली

हाच मार्ग जगायला परवडतो हल्ली


हळूहळू गावाचे शहर होत गेले

जुना पार एकटाच बडबडतो हल्ली


मायेचा ओलावा जिथे फार होता

तोच भाग कधीकधी सादळतो हल्ली


एक चूक घडली अन् अपराधी ठरलो

शंकेच्या कोठडीत वावरतो हल्ली


आठवणींचा वारा, पाने आठवणी

दिवसरात्र हा पिंपळ सळसळतो हल्ली

                                         

सचिन तारो



 गझलकार सचिनजी तारो यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments