● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मित्र आधार झाले 🌷
फायद्याचे सांगणे बेकार झाले
बोलणे आता तसे व्यवहार झाले
ना उघडले दार दोघांनी मनाचे
पाहिले उध्वस्त मी घरदार झाले
'याद' माझ्या सोबती ठेवून गेली
हे सखीचे केवढे उपकार झाले
आसवांना जाळले डोळ्यात त्याने
दुःखही माझे असे दिलदार झाले
एकटा मी भांडलो होतो मनाशी
मित्र आले सोबती... आधार झाले
डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड
खोपोली, रायगड
गझलकार डॉ. सुभाषजी कटकदौंड यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments