● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷सर्व प्रश्नांशी लढावे🌷
कैकदा ठरवून झाले संयमाने मी रहावे
मी जरासे संकटांना शांततेने सोडवावे
मांडली आपापली त्यांनी विचारांची समीक्षा
हे जरी असले तरी ज्ञानास माझ्या अनुभवावे
थांबणे माहीत नाही वेळ अविरत नित्य सरते
समजुनी मी या घडीला भान सारे सावरावे
जिद्द असते आपल्या अंगी तडीला काम न्यावे
मी निराशेच्या छबीला चेतनेने पाजळावे
हो असे होते कधी की वाटते सारे भयंकर
मी कसोशीने तरीही सर्व प्रश्नांशी लढावे
हेमा जाधव
गझलकारा हेमाजी जाधव यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments