Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

बांधू चल सुखाची मोळी Gazalkara Pradnya Kulkarni

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷बांधू चल सुखाची मोळी🌷


शिकवणी लावली मोठी, तरी जमली न रांगोळी

शिकवल्याविण कसे जाळे, बनवतो एकटा कोळी


हृदय तारेतुनी येते अनाहत धून शब्दांची

विषय बुद्धीत साठवते नजर लिहिते सुबक ओळी


सदा तंद्रीत का राहू विचारांच्या.. समस्यांच्या 

मजामस्तीत रमणारी निरागस पाहिजे टोळी


स्थिती मिटली हलाखीची तरीही ठेवली जाणिव 

दिले प्राधान्य गरजेला भरत गेली रिती झोळी 


किती देतोस सुरवंटा जिवाला एकट्या हिंमत

क्षणाचा ना भरोसा पण् तरी उडतेच पाकोळी


दिवसभर चैन करते अन् विसर पडतो व्यथेचाही

कशी धडधड सुरू होते मला म्हणताच घे गोळी


तुला थोड्या मला थोड्या चुका वाटून घेऊया

क्षमा मागून बांधू चल सुखाची नेटकी मोळी


सौ. प्रज्ञा कुलकर्णी 'राज्ञी'


 गझलकारा सौ. प्रज्ञाजी कुलकर्णी यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments