● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷तू नसताना 🌷
तू नसतांना जीवन माझे पुढेच सरकत नाही
तुझ्या वाचुनी मला साजणे क्षणभर करमत नाही
ठेव तेवढ्या जपून ह्रदयी आठवणींना माझ्या
खुशाल जा मग तुला जायचे माझी हरकत नाही
काळजावरी चरे पाडते जीभ चालते जेव्हा
तिच्या सारखी फार बोचरी दुसरी करवत नाही
कशास करतो माय पित्याशी भांडण तंटा लेका
शिवाय त्यांच्या विश्वामध्ये कुठेच बरकत नाही
लाख अडकवा पायी बेड्या लाख उभारा भींती
कुणास द्यावे काळीज कोणी कुणीच ठरवत नाही
काशिनाथ गवळी
नांदगाव नासिक
९८५०४४१२८७
गझलकार काशिनाथजी गवळी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments