● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷गुंफतो श्वासात माझ्या🌷
हिकमतीच्या चार गोष्टी सांगते कानात माझ्या
माय माझी येत असते नेहमी स्वप्नात माझ्या
चाललो बाहेर केव्हा लक्ष असते साजणीचे
मागण्यांचा गोषवारा आणते ध्यानात माझ्या
भास लेकीचा सदोदित जाळतो माझ्या जिवाला
सासरी ती नांदते पण राहते ह्रदयात माझ्या
भावते कविता तिला पण हट्ट गझलेचाच करते
नात अवखळ येत असते आडवी कामात माझ्या
चेहर्यावरचे बदलते भाव त्यांचे ताडतो मी
बालकांचे वागणे पण ठेवतो डोक्यात माझ्या
मी न अवलंबून आहे वारसांच्या भरवशावर
मी पुरेशी रोख रक्कम राखतो खात्यात माझ्या
ठेवली आहे तयारी ईश्वराला भेटण्याची
बारमाही नाव त्याचे गुंफतो श्वासात माझ्या
सिराज शिकलगार
9890597855
गझलकार सिराजजी शिकलगार यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments