● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷तोच खरा विश्वंभर आहे 🌷
खोट्या खोट्या दानाचे अवडंबर आहे
मतदाराला दाखवलेले गाजर आहे
फक्त चांगले निवडावे हे सोपे नाही
भल्याबुऱ्याचा एकत्रच जर वावर आहे
जीवन म्हणजे धडपडणे रोज नवी चिंता
खरा संपतो मरणाने हा संगर आहे
भूक भागते कोंड्याने निजण्याला धोंडा
कष्टकऱ्याचे घर भूमी छत अंबर आहे
पोट रिकामे भरल्यावर शिकण्याचे सुचते
दुनियाभरचे शहाणपण त्यानंतर आहे
बापच असतो पोशिंदा कर पूजा त्याची
घरच्यांसाठी तोच खरा विश्वंभर आहे
मुलगी शिकते घरासही ती दिशा दावते
सुधारणांचे आले हे मन्वंतर आहे
सौ. अर्चना मुरुगकर
गझलकारा अर्चनाजी मुरुगकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments