● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 जीवन अता वेडात शब्दांच्या 🌷
मिळाले दान केवळ एवढे शोधात शब्दांच्या
विसरते दुःख आणि यातना स्पर्शात शब्दांच्या
ऋणाई कागदावर पाझरे साध्याच शाईची
किती श्रीमंत झाली वेदना कर्जात शब्दांच्या
कळेना प्रेम साधे जर तुला सांगून थकल्यावर
मनाच्या भावना मी ओतल्या देहात शब्दांच्या
गझल ओवी कधी कविता अवीट गोडी अभंगाची
कशी गुंतून जाते आपसूक पाशात शब्दांच्या
युगे इतकी भटकले मी सुखाचा शोध घेण्याला
व्यथा माझ्यासवे स्थिरावली शहरात शब्दांच्या
कसेही जीवनाने या मला इतके थकवल्यावर
ठरवले जायचे मी शेवटी शरणात शब्दांच्या
कवाफी लय कधी मक्ता अलामत गण रदिफ बनते
गझलमय वाटते जीवन अता वेडात शब्दांच्या
सौ. सुजाता निंबाळकर
गझलकारा सुजाताजी निंबाळकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments