Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

घे फक्त मांडीवर मला Gazalkar Yogesh Ugale

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷घे फक्त मांडीवर मला🌷


फक्त  शब्दांनीच गारद कर मला 

तडफडू दे आणि घटकाभर मला 


प्राण आहे अडकला ज्याच्यात तो 

देह  म्हणजे  वाटतो  लक्तर  मला 


राग  का  करता  तुम्ही  मागेपुढे? 

थेट तोंडावर म्हणा ना 'मर' मला 


कोण डोळे व्यापुनी आहे उभा? 

दृश्य दाखवतोय जो धूसर मला 


फक्त आठवते तुझी सावध मिठी 

काय  घडले  सांग त्यानंतर मला 


जीव  आनंदून  मग  सोडेन  मी 

एक क्षण घे फक्त मांडीवर मला


योगेश उगले


 गझलकार योगेशजी उगले यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments