Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शृंगारलेली रात ओठांनी Gazalkara Dr. Sujata Marathe

          ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹




 🌷शृंगारलेली रात ओठांनी🌷


मखमली शृंगारलेली रात ओठांनी

मोगरा गंधाळला मग आत ओठांनी


व्हायचे दोघातुनी जे होवुनी गेले

टाळली होती जरी ती बात ओठांनी


शिंपणे चोहीकडे हे चांदण्यांचे की

तेवली देहातुनी तू वात ओठांनी?


दाटुनी येते उराशी ओढ स्पर्शाची

नित्य केलेली अशी रुजवात ओठांनी


फक्त उरलेले शहारे या शरीरावर 

होत असताना प्रिये बरसात ओठांनी


सोडले त्याच्यात वेडे गुंतणे माझे  

का तरी केली पुन्हा सुरुवात ओठांनी?


तोच तो दिसणार नक्की तुज सुजाता जर 

घातला हृदयास केव्हा हात ओठांनी


डॉ. सुजाता मराठे



 गझलकारा डाॅ. सुजाताजी मराठे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments