Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मनातला भाव Gazalkara Tejaswini Kadam

           ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷मनातला भाव 🌷


कसा तुला कळे सख्या मनातलाच भाव हा

मला कधी न लाभला तुझा जरी बनाव हा


उगा कशास रोज हा जिवास घोर लागतो

खुशामती विना जरा जमेल का निभाव हा


तिथे तुझा कितीतरी जमाव थांबला असे

तुला कधी ना लागतो विशाल खोल ठाव हा


मनामधील भावना मनामध्येच ठेवल्या

कशा कुठे समावती न लागतो सुगाव हा 


हळूच सांग गूज तू मनातले अता तरी 

किती खुळ्या कथा उगाच ऐकतोय गाव हा 


बघेच ठेवती कुणी नजर अशीच चोरटी 

लपवुन ठेव आपल्या द्वयीतला झुकाव हा 


रिकाम टेकड्या कुणी पसरवलीय बातमी 

अता तुला मलाच पेलवेल का टिकाव हा 


ऋचा करून ठेवते निभावतेय प्रीत मी 

जपून झाकतेय चेहऱ्यावरी लगाव हा 


जुना नवाच साधलाय ठोकताळ कालचा

नको बदल करूस ठेव आपला स्वभाव हा



डॉ तेजस्विनी अनिल कदम

नाशिक

मो. ९८२२८७९००१



 गझलकारा डाॅ. तेजस्विनीजी कदम यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments