● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷असू शकते🌷
तुझ्यावरची तिची शंका जरी भलती असू शकते
कधी शाळेत गेलेली नजर कळती असू शकते
अवस्था चातकापेक्षा बळीची वेगळी नसते
मुठीमध्ये बियाणे अन् नजर वरती असू शकते
बदलते वेळ सगळ्यांची बदलतो दिवस सुद्धा
तुझ्या जागी उद्या माझी इथे चलती असू शकते
अडाणी माय जन्माची तरी घरदार संस्कारी
विचाराची घरामध्ये तिच्या पणती असू शकते
नका अश्रू म्हणू डोळ्यातले पाहून पाणी पण
तिच्या डोळ्यास आलेली जरा भरती असू शकते
कसा निघतो धुराचा लोट काळा आग विझल्यावर
तिथे धपली विझवलेली जरा जळती असू शकते
फुलांचा मोह माझ्या मी मनाचा टाळतो आता
पुरे गणगोत काट्यांचे फुलांभवती असू शकते
नसावा येत म्हणुनी का कधी परतून मेलेला
वरी याहून सुंदर आणखी धरती असू शकते
संजय तिडके
गझलकार संजयजी तिडके यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments