Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सत्तेसाठी बनाव सारा Gazalkar Pravin Turankar

                        ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷 सत्तेसाठी बनाव सारा🌷


नावापुरती विचारधारा 

सत्तेसाठी बनाव सारा


आरोपांच्या फैरी  वरवर  

आतुन असतो भाई-'चारा' 


जनता ठरते मूर्ख तशीही

कोणाच्याही बटणा मारा


तत्त्वे सारी चुलीत घाला

चांस मिळाला, डल्ला मारा


कमर्शियल ही दुनिया झाली

माणुसकीला नाही थारा


सोयीनुसार सारे आहे

दाखवायला बोंबा मारा


 प्रवीण तुरानकर

हनुमान नगर, राजुरा

जिल्हा चंद्रपूर 

9822572522



 गझलकार प्रवीणजी तुरानकर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments