● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 मनासारखा नसतो श्रावण आता 🌷
आठवणींतच उरले केवळ सडा-सारवण आता
माझ्या दारापुढे राहिले नाही आंगण आता
सागरगोटे रुमालपाणी कोणी खेळत नाही
चूल बोळके लुटूपुटूचे सरले भांडण आता
चाळ संस्कृती सणासुदीची धांदल उरली नाही
चढाओढ ना रांगोळ्यांची ना चैत्रांगण आता
प्रदूषणाच्या विळख्यामध्ये फसली आहे सृष्टी
रिमझिमणारा मनासारखा नसतो श्रावण आता
जेन झेड अन् अल्फा बीटा पिढ्या जन्मल्या येथे
पकडा पकडी खेळ मजेचे कुठे बालपण आता
मीना शिंदे
गझलकारा मीनाजी शिंदे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments