● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 या बाईचे 🌷
कौतुक आता किती करावे या बाईचे!
ध्येय तोकडे कसे म्हणावे या बाईचे
अनेक कार्ये नियमित करते अशी एकटी
चिडणे पण मग खरे नसावे या बाईचे
नीट नेटके घरास जर ती सतत ठेवते
नटणे थटणे छान असावे या बाईचे
सहनशीलता सदा पाळते लोकांमध्ये
हास्य मुखावर नित्य बघावे या बाईचे
नाते बंधन दोन घरांचे सहज पेलते!
अनंत गुण हे असे पहावे या बाईचे
हसतमुखाने वाद टाळते मेळ घालते
अजब कलेचे सार्थक व्हावे या बाईचे
उच्च पदावर जसे शोभते रूप लाघवी
घरकुलातही बिंब दिसावे या बाईचे.
शोभा वागळे
मुंबई.
मो. 8850466717
गझलकारा शोभाजी वागळे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments