• गझल प्रभात •
🌹वाढदिवस विशेष 🌹
🌹क्षणाचे सोबती सारे🌹
कुणाचे दुःख कुरतडणे मनाला भावले नाही
कुणाच्या सावलीला मी उन्हाशी जाळले नाही
जसे प्रेमात पडलेले कटू अंतर मिटत गेले
कुणी मग जिंकले नाही कुणी मग हारले नाही
घडावी माय बापाची जिथे सेवा मनोभावे
तिथे मग दुःख आल्याचे मिळाले दाखले नाही
कशाला शोधतो मृगजळ अगोचर वाळवंटी या
तुझ्या डोळ्यातले गहिरे सरोवर आटले नाही
तिथे एकांत जळताना मला हे सार उमगावे
क्षणाचे सोबती सारे कुणीही आपले नाही
निरंतर जन्म मरणाचे किती मी दुःख झेलावे
विधात्या दोर परतीचे कसे तू कापले नाही
निळ्या डोळ्यात बुद्धाच्या खरे जीवन उमगल्यावर
पुन्हा डोळे कुणाचे मग कधी मी वाचले नाही
डॉ नंदकिशोर दामोधरे
अमरावती
मो. 9890911263
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments