Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गोष्ट निराळी Gazalkar Anant Deshpande

  • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹 गोष्ट निराळी 🌹


ही कसली जटील आहे जगण्याची गोष्ट निराळी 

जो आनंदी असतो त्या फकिराची गोष्ट निराळी


केल्यावर दान पसाभर तू सांग जगाला साऱ्या

दानात कवच देणाऱ्या कर्णाची गोष्ट निराळी


प्रश्नावर उत्तर म्हणुनी मी स्तब्ध राहिलो केवळ

कळणार तिला का माझ्या मौनाची गोष्ट निराळी


लखलाभ तुम्हाला शहरे लखलाभ घराच्या भिंती 

आकाश मोकळे इथले गावाची गोष्ट निराळी


हे झाले बरे म्हणावे जखमेने धरली खपली 

आतून तिच्या भळभळत्या दुःखाची गोष्ट निराळी 


अनंत देशपांडे


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments