● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷शेजार फुलांचे केले 🌷
कोरून हवा श्वासांनी आकार फुलांचे केले
मी खोल जुन्या जख्मांना श्रृंगार फुलांचे केले
फुकटात घेतला नाही उपकार कधी कोणाचा
मी काट्यांच्या बाजारी व्यापार फुलांचे केले.
मी जिथे जिथे तुज दिसलो पोटाची वणवण होती
पण जिथे थांबलो तेथे शेजार फुलांचे केले
हृदयाला जपण्यासाठी संसर्ग टाळण्यासाठी
मी अराजकावर काही मग वार फुलांचे केले
पेटून इरेला त्यांनी रतनांची उधळण केली
मी हार देवतेसाठी लाचार फुलांचे केले.
गेलेत चरे काचेला दगडांच्या सौजन्याने
मी मात्र परत जे केले साभार फुलांचे केले
शिक्षेचा मानस नव्हता सातत्य भयंकर होते
जीवघेण्या असुयेसाठी अंगार फुलांचे केले
छोटेसे घरकुल माझे आश्वस्त रहावे करिता
हे कुंपण आग्रह होता मी तार फुलांचे केले.
मी नाही दगडी भिंती नात्यात बांधल्या केव्हा
संसार नेटका केला घरदार फुलांचे केले
अनंत नांदूरकर 'खलिश'
गझलकार अनंतजी नांदूरकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments