Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सोनचाफा Gazalkara Rekha Dhage

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷सोनचाफा 🌷


आसमंती गंध भरतो सोनचाफा

अत्तराचे काम करतो सोनचाफा


भेट त्याची घ्यायला बघ ती निघाली 

माळलेला त्यास छळतो सोनचाफा


साजणीला देत चाफा गोड हसता

राग सारा दूर करतो सोनचाफा


औट घटकेचेच आहे औक्ष त्याचे

तू दिलेला नित्य स्मरतो सोनचाफा


सद्गुरूला प्रेमभावे वाहिलेला

फार पिवळा जर्द दिसतो सोनचाफा


डॉ. रेखा अनिल ढगे



 गझलकारा डाॅ. रेखाजी ढगे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments