● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷उपकार 🌷
त्याच्याच चाहत्यांनी पाठीत वार केले
निर्जिव कलेवराचे तुकडे हजार केले
जातीत जात न्यारी पंथात पंथ न्यारे
धर्मात एक एका पंडीत चार केले
होता बळी सुखाने स्वप्नात दंगलेला
निष्ठूर ढगफुटीने जगणेच भार केले
झाले तुरूंगवासी पंडित महान ज्ञानी
म्हणती विरोधकांनी खोटे प्रचार केले
नाहीच लेक रडला प्रेतास जाळताना
बापावरी मुलाने उपकार फार केले
शिवाजी साळुंके,'किरण'
----------------
🍀अल्प परिचय🍀
शिवाजी धर्माजी साळुंके
जन्म- १२-१२-१९४७
सेवानिवृत्त प्राचार्य
चाळीसगाव, जि. जळगाव.
संस्थापक अध्यक्ष- परिमल साहित्य कला मंच, महाराष्ट्र राज्य, शाखा चाळीसगाव, जि. जळगाव.
उपाध्यक्ष- चेतना शिक्षण संस्था, वरोरा, जि. चंद्रपूर.
विश्वस्त- मसाप पुणे, शाखा चाळीसगाव, जि. जळगाव.
प्रकाशित वाङमय-
१) चाहूल (कविता संग्रह)
२) थुई थुई मोरा (बाल कविता संग्रह)
३) कथा जनाच्या व्यथा मनाच्या (कथा संग्रह)
विशेष आवड- मराठी, हिंदी व अहिरानी भाषेत कविता व गझल लेखन!
गझलकार आप्पासाहेब शिवाजी साळुंके यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments