Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पैसा Gazalkar Sunil Bavne

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷 पैसा 🌷


आला कितीक आणिक गेला निघून आहे 

पैसाच शेवटी तो कोठे टिकून आहे


पडणार फार नाही पैसा कमी मलाही 

माझाच मित्र जेव्हा सोबत बसून आहे


होता जवळ जरासा नाते जुळून होते 

गुणधर्म गोडव्याचा आला कळून आहे 


ऐटीत उंच होता जो झोपड्या मधोमध 

वाडा अता पुराना निपचित पडून आहे


कैदेत मोठमोठ्या डांबून ठेवला पण 

पैसाच शेवटी तो येतो सुटून आहे


विसरून सर्व काही पैश्यास मानणाऱ्या 

औकात मानवाची तो ओळखून आहे


गरजे पलीकडेचा असुनी अमाप पैसा 

मडक्यात शेवटी बघ राखट उरून आहे


        

सुनील बावणे - निल

 बल्लारपूर, चंद्रपूर



 गझलकार सुनीलजी बावणे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments