● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷माझी गझल मराठी🌷
माझी गझल मराठी बहरात येत आहे
गंधाळते नव्याने रमवीत नेत आहे
गझलेस व्यापणारा मतला नवा अनोखा
अर्थास फुलवणारे....कसदार शेत आहे
सारेच शेर खासे तुमच्याच अंतरीचे
राखीव खास काही...आत्मीय बेत आहे
ही भारली विधा ह्या भूमीत नांदताहे
भाषेस जी मराठी, फुलवीत येत आहे
गझलेत चित्त माझे तल्लीन होत जाते
तेजाळ तारकांचे आकाश देत आहे
अशोक म. वाडकर
गझलकार अशोकजी वाडकर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments