● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मारल्याने ठार होतो का?🌷
काळजाच्या पार होतो का?
शब्दही अनुदार होतो का?
पाझरावी लागते माया
व्यर्थ कोणी यार होतो का?
लेकरे मोठी जरी झाली
जीव माझा घार होतो, का?
तू फुलांना ओव प्रेमाने
टोचल्याने हार होतो का?
अंत माझा चिंतिला का रे?
मी कुणाला भार होतो का?
घातल्याने वस्त्र खादीचे
देशप्रेमी फार होतो का?
लोकसेवा धर्म मानी जो
मारल्याने ठार होतो का?
चंद्रकांत धस
गझलकार चंद्रकांतजी धस यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments