● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 शक्यता आहे 🌷
घाटात दरड कोसळण्याची फार शक्यता आहे...
प्रेमात जीव जाण्याचीही फार शक्यता आहे...
जिथे तिथे का धूसर धूसर तुझी आकृती दिसते
चेटूक मला तू करण्याची फार शक्यता आहे...
आजचा दिवस आनंदाने आपण जगून घेऊ
उद्या खरे तर मी नसण्याची, फार शक्यता आहे...
पोहत आहे जन्म कधीचा अथांग इथला सागर
जिंदगी सिकंदर होण्याची फार शक्यता आहे..
पुढे पुढे माझ्या दुःखाच्या कविता झाल्या सार्या
वाचून तुझे मन भिजण्याची फार शक्यता आहे...
माधुरी चौधरी वानखडे
पुणे
गझलकारा माधुरीजी चौधरी वानखडे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments