● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मनाचे घाव 🌷
मनावर घाव झालेला दिसत नाही
मनाचे बिंब मुखड्यावर पडत नाही
जरी शिकला तुम्ही.. गेलात चंद्रावर
प्रथा इथली खुळी काही सरत नाही
त्वचेच्या पादुका केल्या जरी आम्ही
तरी ऋण मायबापाचे फिटत नाही
कितीही वागले दुर्जन दिखाव्याने
तरी बदमाश वृत्ती ही लपत नाही
जरी असली जवळची माणसे सोबत
तुला विसरायचे दुःखा, जमत नाही.
अनिसा सिकंदर शेख
ता. दौंड जि. पुणे
९२७००५५६६६
गझलकारा अनिसाजी सिकंदर शेख यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments