Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

शायराचे काय झाले Gazalkar Vinay Patil

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷शायराचे काय झाले?🌷


प्रश्न हा नाहीच की त्या, अत्तराचे काय झाले

कोणताही दोष नसलेल्या फुलाचे काय झाले ?


चांगला प्रोजेक्ट आहे, मॉलही परफेक्ट आहे

पण जुण्याश्या गच्च हिरव्या, डोंगराचे काय झाले... ?


एवढे रस्त्यात खड्डे, वाटतो खड्ड्यात रस्ता

काय झाले त्या खडीचे, डांबराचे काय झाले...?


तू निवडणुक जिंकल्यावर, खूप मालामाल झाला

फायद्याचे फार झाले,वायद्याचे काय झाले... ?


आजही पडक्या घराने अन् विटांनी प्रश्न केला

योजना मंजूर होती मग घराचे काय झाले...?


ऐन लग्नाच्याच दिवशी, ती तिच्या खोलीत नव्हती

बांधुनी बाशिंग बसलेल्या मुलाचे काय झाले... ?


शायरी सोडून दे तू, भाकरी देतो म्हणाले

या पुढे अंदाज लावा, शायराचे काय झाले... ?


विनय पाटील 'कमांडर'



 गझलकार विनयजी पाटील यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments