● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷काळिज माझे🌷
शब्दांना मी दिधले आंदण काळिज माझे
काव्याचे मग करते रोपण काळिज माझे
निसर्ग सांडे माणिक मोती रत्नै पाचू
लाभे त्यांना सुरेख कोंदण काळिज माझे
कोमल हळव्या भाव भावना अंतरातल्या
सहजच करते त्यांची राखण काळिज माझे
गंधित जखमा कोणी देते हव्याव्याशा
हळूवारसे करते लिंपण काळिज माझे
माझी माझ्यावरती प्रीती सखी प्रकॄती
आतच नांदे तिचाच साजण काळिज माझे
पहावयाचे रूप तुला तव असेल देवा
डोकावुन तर पाही दर्पण काळिज माझे
डॉ. संजीवनी तोफखाने
गझलकारा डॉ. संजीवनीजी तोफखाने यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments