● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷गझल सोबतीला असणार शेवटी 🌷
देऊन काय कोणी देणार शेवटी
अपुलाच आपल्याला आधार शेवटी
जगणे कठीण होते कायम मला इथे
मृत्यू किती निघाला दिलदार शेवटी
टाळायचे तुला तर बिनधास्त टाळ तू
माझ्या शिवाय अधुरी कळणार शेवटी
तू कर भले कितीही गावात या तुझ्या
ही भावकी तुझ्यावर जळणार शेवटी
सारे जरी 'प्रसन्ना' सोडून चालले
पण गझल सोबतीला असणार शेवटी
प्रसन्नकुमार धुमाळ
मु. पो. आलेगाव, ता. दौंड, जि.पुणे
गझलकार प्रसन्नकुमारजी धुमाळ यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments