Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

माणूस वेदनेने.. Gazalkar Avinash Kasande

  ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷माणूस वेदनेने..🌷


माणूस वेदनेने कुढतो कसा बघा ना,

पाऊस घोषणांचा पडतो कसा बघा ना -


कुठली विकासगंगा येथे खळाळते की ?

हा पूर प्रगतिचा मग अडतो कसा बघा ना -


गावतला पुढारी होतो धनाढय जेंव्हा,

सामान्य जन भुकेला नडतो कसा बघा ना - 


हातातल्या पिकाला जेंव्हा गिळे अवर्षण,

मालक बळी बिचारा रडतो कसा बघा ना - 


सुजलाम देश असतो अमुचा तरी सदा हा,

उल्लेख कागदावर जडतो कसा बघा ना -


अविनाश कासांडे,

सुपेकर, 

'वसंतुषा' निवास, ओम नगर, मु. पो. गंगाखेड, जि. परभणी

मोबा. 9421278775


 गझलकार अविनाशजी कासांडे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments