Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

पैसा यार आहे Gazalkar Avinash Patil

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷पैसा यार आहे🌷


या जगाचा हा कसा व्यवहार  आहे

माणसाचा फक्त  पैसा यार आहे


ही धनाची शान खोटी  सोसवेना

निर्धनाची हीच रे तक्रार  आहे


चांद आहे काळरात्री झाकलेला

काजव्याला  लाभतो पुरस्कार  आहे


पायरीशी  मी तयाच्या का उभा रे

रे नशीबा तू कुठे दिलदार  आहे


सोसवेना भार आता यातनांचा

वेदनेला भावनांचे दार आहे


आटते का प्रेम सारे आपुल्याचे

या धनाला मतलबीच किनार आहे


पैलतीरी नाव माझी  चालली रे

सोडलेला जीवनाचा दोर  आहे


डाॅ. अविनाश पाटील

पनवेल


 गझलकार डाॅ. अविनाशजी पाटील यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments