● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कशी व्याख्या करू 🌷
अनादर होत असतो ऐन यौवन दाटल्यावर
मुलांना बाप कळतो ठेच भारी लागल्यावर
कशाला भीक मागू देवळाच्या पायरीवर
यशाची साथ मिळते घाम येथे सांडल्यावर
मनाचा तोल गेला मी जराशी घेतल्यावर
स्वतःला सावरावे लागले ती भांडल्यावर
उन्हाच्या काहिलीमध्ये पिकांची राख झाली
नभाला जाग आली पण पिकांना जाळल्यावर
कशी व्याख्या करू मी पाप पुण्याची सदेवा
फुले अर्पण करू की पाप होईल तोडल्यावर
निलेश भुडे
गझलकार निलेशजी भुडे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments