Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आवाज कशाला Gazalkara Sneha Shewalkar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷आवाज कशाला ..?🌷


वडिलोपार्जित धन संपत्ती त्याचा इतका माज कशाला 

घाम गाळुनी सर्व कमवले कष्टाची त्या लाज कशाला

 

मन स्वास्थ्याने खुलते कांती तेज पसरते सहज मुखावर 

दिसण्यासाठी सुंदर मोहक हवा वेगळा साज कशाला


सांगड घालत नव्या जुन्याची दुनिया जगते आनंदाने 

ढोल वाजवत पुढारल्याचा करतो तो आवाज कशाला ?


विभक्त झालो अविचाराने क्षणात दोघे दोन दिशांना 

स्वतः उसवले बंध आपले पुन्हा आठवण आज कशाला


ऐक सागरा! उधाण आले तर येऊ दे मुक्तपणाने 

थांग तळाचा लपण्यासाठी लाटेची ही गाज कशाला


सौ. स्नेहा संतोष शेवाळकर

पुसद जि. यवतमाळ



 गझलकारा सौ. स्नेहाजी शेवाळकर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments