Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

कणा मोडतो तिचा वाकण्यातच Gazalkara Snehalata Zarkar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷कणा मोडतो तिचा वाकण्यातच🌷


दिवस पूर्ण जातो उन्हे टाळण्यातच

तशी रात्रही चांदण्या मोजण्यातच


विलंबास थारा निसर्गात नाही

तरी व्यग्र मन कोंबडे झाकण्यातच


झुळुक एक स्पर्शून गेली अचानक

किती वेळ गेला तुला शोधण्यातच


तुझे प्रश्न अन् उत्तरे तूच त्यांची

सुखी मौन माझे मुके राहण्यातच


नका जास्त कौतुक करू नम्रतेचे

कणा मोडतो मग तिचा वाकण्यातच


स्नेहलता झरकर-अंदुरे

धाराशिव



 गझलकारा स्नेहलताजी झरकर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments