● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷आशय काय कामाचे🌷
आपले जे दावती भय काय कामाचे
श्वास जे ना पकडती लय काय कामाचे
गाजवावे शौर्यही घनघोर लढताना
फक्त तोंडी मुक्त जय जय काय कामाचे
आपल्याला लागल्यावर ठेच जे हसती
भोवताली मित्र निर्दय काय कामाचे
भार हलका फक्त व्हावा याचसाठी जे
आणती कामात व्यत्यय काय कामाचे
ज्ञान वाढावे तशी मग जानही यावी
फक्त अपुले वाढते वय काय कामाचे
कमवले त्याचा इथे उपभोगही घ्यावा
फक्त करणे मुक्त संचय काय कामाचे
नेमक्या शब्दात सांगा नेमकी गफलत
अर्थ नाही ज्यास आशय काय कामाचे
बबन धुमाळ
आलेगाव, ता दौंड,
जि पुणे 413801
मो नं 9284846393
गझलकार बबनजी धुमाळ यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments